प्रशासनही हादरलं; 'या' जिल्ह्यात 9600 मुलींचे बालविवाह, 18 वर्षांआधीच लेकी गर्भवती



ब्युरो टीम
: जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीने संपूर्ण जिल्हा प्रशासन हादरले आहे. गेल्या अडीच वर्षात 9 हजार 600 मुलींचे बालविवाह झाल्याचं स्वतः महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत जाहीर केले आहे.

     जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही आकडेवारी समोर आल्याबरोबर एकच खळबळ उडाली आहे. 52 हजार 773 महिलांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या विषयावर चर्चा सुरू झाली. 

     जिल्ह्यातील वाढते कुपोषण नियंत्रणात कसे आणता येईल? यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. यादरम्यान जिल्ह्यातील 52 हजार 773 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात 9 हजार 600 मुलींचे म्हणजेच 18.96% मुलींचा बालविवाह झाल्याचा समोर आला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यातील 2 हजार 365 मुली या अठरा वर्षाच्या आतच गर्भवती होऊन आई झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनीच ही आकडेवारी जाहीर केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने