राजकीय पक्षांना जनतेला आश्वासने देण्यापासून रोखता येणार नाही


 मुक्त निवडणूक आश्वासनांवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी


दिल्ली : राजकीय पक्षांच्या मुक्त निवडणूक आश्वासनांवर (रेवडी संस्कृती) सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. राजकीय पक्षांना जनतेला आश्वासने देण्यापासून रोखता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले असून, सरकारी पैसा कसा वापरायचा हा प्रश्न असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच या प्रकरणावरील सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे.

      याप्रकरणी समिती स्थापन करण्याबाबत सर्व पक्षकारांनी शनिवारपर्यंत आपल्या सूचना देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहे. निवडणुकीत मोफत योजनांच्या घोषणेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली त्यावर न्यायालयाने वरील टिपण्णी केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने