मंगलप्रभात लोढांची विरोधकांना साद


ब्युरो टीम: विधीमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यामुळे नव्याने खात्याच पदभार स्वीकरलेल्या मंत्र्यांना अभ्यासासाठी पाहिजे असा वेळ मिळालाच नाही. यामुळे अनेक मंत्र्यांची विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देताना दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत घडला आहे. यावेळी चक्क त्यांनी विरोधकांना साद घालत 'मी नवीन प्लेअर जरा संभाळून घ्या' असे म्हटले.

        "शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासंबंधी एखादी पॉलीस शासन विचारी आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अनेकदा जनगणनेचे काम अनेकदा शिक्षकांवर अतिरिक्त बोजा म्हणून लादले जाते. त्याऐवजी या कामासाठी या बेरोजगारांना शासन समाविष्ट करून घेणार का? या संदर्भात एखाद्या पॉलिसीचा शासन विचार करणार आहे का? असे विचारण्यात आले. त्यावर लोढा यांनी अतिशय मिश्किलपणे वरील साद घातली आहे.

         लोढा म्हणाले की, "सभापती महोदया, एक तर मी नवीन प्लेयर आहे, त्यात मला ओपनिंगला उभे केले आहे आणि माझ्यावर बाऊन्सर वर बाऊन्सर टाकले जात आहेत. आता तरी थांबा कारण त्या प्रश्नाचा याच्याशी काहीही संबंध नाही" मंगलप्रभात लोढा यांच्या या उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला. "तुमच्या सर्व प्रश्नांवर मी सविस्तर उत्तर देईन असे ते म्हणाले. दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या खाजगी आस्थापनांनी कौशल्य विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक आहे" असे उत्तरही त्यांनी दिले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने