ब्युरो टीम:देशाहीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे उत्कर्ष शिंदे. ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे, शिंदेशाही गाण्याची ही परंपरा समर्थपणे पेलत आहे. बिग बॉस मराठीतून त्याची आणि आपली भेट झाली. त्याच्या दमदार खेळाने तो प्रेक्षकांच्या घरातच नाही तर मनात पोहोचला. उत्कर्ष डॉक्टरकी, गायन, लेखन, संगीत दिग्दर्शन अशा अनेक भूमिका पार पाडत आहे. उत्कर्ष एक उत्तम व्यक्ती असून सामाजिक आस्था बाळगणारा आहे. अनेकदा तो सामाजिक कार्यातही व्यस्त असतो. आजही त्याच्या एका पोस्ट मधून त्याचे विचार, त्याची सामाजिक बांधिलकी दिसून आली आहे. काल झालेल्या स्वातंत्र्यदिनी त्याच्या समोर एक तृतीयपंथी व्यक्ती आली, तिच्यासोबत फोटो घेत उत्कर्षने एक पोस्ट लिहिली आहे. जी पाहून आपलेही डोळे उघडतील.
तृतीयपंथी म्हंटलं की आजही आपण नाक मुरडतो. त्यांना ना आपल्या जीवनात स्थान आणि ना समाजात. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आजही गंभीर आहे. अनेकदा शिक्षण असूनही त्यांना नोकरी मिळत नाही. असे कित्येक तृतीयपंथी रोज आपल्याला रस्त्यावर, सिग्नलवर भिक्षा मागताना दिसतात. असाच एक तृतीयपंथी व्यक्ती काल १५ ऑगस्ट रोजी गायक, गीतकार उत्कर्ष शिंदे याला एक सिग्नलवर भेटला. त्यावेळी जे काही घडलं ते उत्कर्षने एका पोस्ट मधून सांगितलं आहे. उत्कर्ष म्हणतो, 'आज तुला पाहिल आणि विचार बदलले .... “जो भरा नहीं है भावों से, जिसमें बहती रसधार नहीं । वह हृदय नहीं है पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं।”
राष्ट्रप्रेम सर्वोच्च प्रेम म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तिला आपल्या जन्मभूमी वर निस्वार्थ प्रेम असावे.
आज सिग्नल ला माझी कार थांबली आणि समोर तू दिसलीस,तुला पाहून खरंच संकुचित विचारांच्या लोकांना तू आज चपखल उत्तर दिलंस .'
पुढे तो म्हणतो, 'कोण तू ? कुठली तू ? तू नर ? कि नारी? ,ह्या वरून तुझे परीक्षण आज पर्यंत भवताल च्या बऱ्याच लोकांनी केले असेल. पण तू त्याचं उत्तर "तू प्रथम भारतीय " आहेस हे तू आज तुझ्या पेहेराव्यातूनच नाही तर तुझ्या बोलण्यातून ठासून दाखवलंस. कारची काच मी जेव्हा खाली घेतली आणि तू हसत किती सकारात्मकतेने "साहब भारत माता कि जय हो" म्हणालीस . आणि पैसे नहीं चाहिये आज .आज सिर्फ दुआ दूंगी म्हणत डोक्यावरून हाथ फिरवलास आणि प्रवास भर मी तुझ्यातल्या माणुसकीला ,देश प्रेमाला मनोमन सलाम करत राहिलो . 75व्या स्वातंत्र्य दिनी आज खरंच भासल बुरसटलेल्या, भेद भाव मानणाऱ्या,माणसाला माणसापासून दूर ठेवणाऱ्या विचारांपासून काहींना अजूनही स्वातंत्र्य मिळणे बाकी आहे.' उत्कर्षच्या या पोस्ट मुळे त्यांनी चाहत्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.
--------
टिप्पणी पोस्ट करा