सुप्रीम कोर्टात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जनहित याचिका


ब्युरो टीम: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आता सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल झाली आहे. यापूर्वी शिवसेनेनं शिंदे गटाविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. त्यानंतर आता नवी जनहित याचिका दाखल झाली आहे. अॅड. असीम सरोदे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

     शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताना राज्य घटनेच्या १० व्या परिशिष्टाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. २२ ऑगस्टला यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मतदारांचीही मतं कोर्टानं ऐकून घ्यावीत अशी विनंती या याचिकेतून कोर्टाला करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने