निधी संकलन प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाचा सोमय्या पिता-पुत्रांना दिलासा


ब्युरो टीम: आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकलन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने  सोमय्या पिता-पुत्रांना दिलासा दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या व त्यांचा पुत्र निल सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आली आणि त्यांची याचिका निकाली काढली. तसेच, या दोघांविरोधात तूर्तास आर्थिक घोटाळा केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाही. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची याचिका निकालात काढली असल्याचे समजत आहे.

       किरीट आणि निल सोमय्या यांची पोलीस चौकशी सुरूच राहणार असल्याचे म्हटले जात आहे. दोघांनाही अटक करण्यापूर्वी ७२ तासांची नोटीस देण्याचे पोलिसांना न्यायालयाने आदेश दिले आहे. मुंबई पोलिसांसमोर या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे नवे समन्स पोलिसांकडून जारी केले जाणार. पोलिसांकडून किरीट सोमय्यांची १७ ऑगस्टला तर नील सोमय्यांची १८ ऑगस्टला निधी संकलन प्रकरणात पुन्हा चौकशी होणार आहे. सोमय्या पिता-पुत्रांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकलनातील ५७ कोटी रुपये स्वतःकडे ठेवत जनतेची फसवणूक केली. हा गुन्हा माजी लष्करी कर्मचारी बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात नोंदवला होता. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोमय्या पिता-पुत्रांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने