मोदींच्या मंत्री मंडळात शिंदे गटाच्या दोघांची होणार निवड



ब्युरो टीम:  पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लवकरच फेरबदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांपैकी दोघांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती देखील आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांनी चांगलं काम केलेलं नाही त्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गेल्या वर्षी जुलै महिन्यात फेरबदल करण्यात आला होता. आता केंद्र सरकार नव्यानं मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटातील कोणत्या दोन खासदारांना संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.

कामगिरी चांगली नसणाऱ्या मंत्र्यांना डच्चू ?

        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसेल त्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय जदयूनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जदयूच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिकामं आहे. याशिवाय २०१९ मध्ये शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडताना अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळं आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या समर्थक खासदारांना मंत्रिपद मिळू शकतं.

      शिंदे गट भाजपचा सर्वात मोठा मित्र

         राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे लोकसभेत ३३६ खासदार आहेत. भाजपचे ३०३ खासदार असून त्यानंतर सर्वाधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या खासदारांची संख्या १२ इतकी आहे. त्यामुळं आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दोन मंत्रिपद दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे गटातून कोण मंत्री होणार

         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातील शिवसेनेच्या ४० आमदारांसंह बंड केलं. त्यानंतर शिवसेनेच्या महाराष्ट्रातील १८ खासदारांपैकी १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे , हेमंत पाटील ,प्रतापराव जाधव ,कृपाल तुमाणे,भावना गवळी,श्रीरंग बारणे ,संजय मंडलिक ,धैर्यशील माने ,सदाशिव लोखंडे ,हेमंत गोडसे,राजेंद्र गावित या बारा खासदारांपैकी कोणत्या नेत्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार लवकरच स्पष्ट होईल.

-------------- 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने