ब्युरो टीम: विधानसभेत आज विविध मुद्द्यांवर चांगलीच गरमागरम चर्चा झाली. आजच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर तासाभरातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार बड्या नेत्यांनी घेरलं आणि एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. अचानक प्रश्नांचा भडीमार सुरु झाल्यानं मुख्यमंत्री गडबडले पण यावेळी त्यांच्या मदतीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे धाऊन आले. त्यांनीच स्वतः विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयकावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचं विधेयकही मांडलं. यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ या नेत्यांनी शिंदेंना एकामागून एक प्रश्न विचारुन भांभावून सोडलं.
आव्हाड म्हणाले, जनतेतून नगराध्य़क्ष निवडीऐवजी सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय एकनाथ शिंदे हे नगविकासमंत्री असताना घेतला होता. पण आता त्यांनी आपला निर्णय बदलला. त्यामुळं यावर शिंदेंनी आपला निर्णय बदललाच कसा? यामागचं काही सबळ कारण त्यांनी सांगितलं आहे? असा सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर जंयत पाटील पॉईंट ऑफ आर्थुर सांगण्यासाठी रांगेत उभे राहिले. यानंतर मुख्यमंत्री काहीशी गडबडलेले पाहिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांनीच मुख्यमंत्र्यांना सावरल्याचा प्रत्न केला.
दरम्यान, अजित पवारांनी चांगलीच फटेकेबाजी केली. त्यांनी म्हटलं, एकतर तुम्ही हे विधेयक मागे घ्यावं, आपल्याला शक्य नसेल तर ते संयुक्त समितीकडे पाठवा. दोन्ही सभागृहातील दिग्गज यावर अभ्यास करतील आणि त्यानंतर ओग्य निर्णय होईल. यावेळी जसं आमदारांमधून निवडून येऊन तुम्ही मुख्यमंत्री झालात. पण ग्रामपंचायतमधील हा अन्याय कसला. दुसरीकडे छगन भुजबळांनीही मुख्यमंत्र्यांना घेरलं. भुजबळ म्हणाले, एकनाथ शिंदे आमचे चांगेल मित्र आहेत पण त्यांची वैचारिक भूमिका वारंवार बदलते आहे. आपणच घेतलेले निर्णय आपण बदलोत ाहोत हे काय सुरु आह? असा सवालही त्यांनी केला.
--------------
टिप्पणी पोस्ट करा