ब्युरो टीम: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी काल ईडीने छापा टाकला. यानंतर रात्री उशीरा राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. यानंतर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'बऱ्याच जणांना नोटीस आली, काही लोकांनी उत्तर दिली. काहींनी दिली नाही. राज्य आणि देशातील यंत्रणांनी सूड बुद्धीने किंवा सूड भावनेने कोणतीही कारवाई करता कामा नये, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी आज दिली.
अजित पवार म्हणाले, ४ दिवसांचा दौरा करून आल्यानंतर उद्या मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून पत्र देणार आणि पत्रकार परिषद घेणार आहे. जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्यावर बोलताना पवार म्हणाले, केंद्रात सरकार असल्यावर राष्ट्रीय पातळीवर पक्ष टिकावा म्हणून अशी विधान करावी लागतात.
इतिहास बघता वेगवेगळ्या राज्यातील पक्ष पुढे येत असतात. काही वर्षांपूर्वी कुणी सांगितले होते का की आप हा पक्ष पुढे येईल . पण आता पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये पक्ष पुढे आला आहे. त्यामुळे त्यांना वाटून काही होत नसते जनतेच्या मनात जे येईल त्यानुसार होईल, असंही पवार म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली. फारच दुःखद आहे. ज्यांच्यावर कारवाई होते ते फारच अडचणीचं होते, घरदार उद्ध्वस्त होते, असंही पवार म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा