आदित्य ठाकरेंच्या सभांनी शिवसैनिक चार्ज, आता उद्धव मैदानात; महाप्रबोधन यात्रा गेमचेंजर ठरणार?


 ब्युरो टीम: महाराष्ट्रातील राजकारणात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोरी केल्यानंतर आता शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं. मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपला ढासाळलेला पक्ष वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. त्याशिवाय आता उद्धव ठाकरेंनीही राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंची ही महाप्रबोधन यात्रा गणपती उत्सवानंतर सुरू होणार आहे. पहिलीच महाप्रबोधन यात्रा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाशिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सप्टेंबरमध्ये महाप्रबोधन यात्रा सुरू करतील. कोल्हापुरातील बिंदू चौकात त्यांच्या जाहीर सभेने यात्रेचा समारोप होणार आहे. उद्धव ठाकरेंवर तो लोकांमध्ये जात नसणारे नेते असल्याचा आरोप आहे. आता या यात्रेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीसाठी जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधान विशेषज्ञ आणि राजकीय जाणकार सुरेश माने यांनी सांगितलं, की उद्धव ठाकरेंकडे आता कोणताही पर्याय नाही. त्यांना आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी लोकांमध्ये जावंच लागेल.

टेंभी नाक्यातूनच मुख्यमंत्र्यांना आव्हान गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील टेंभी नाक्यात घेणार आहेत.

                    महाप्रबोधन यात्रा हा एक चांगला उपक्रम असून याद्वारे ते आपल्या पक्षाला वाचवू शकतात. या यात्रेद्वारे उद्धव ठाकरे महाराष्ट्र सरकारसह शिंदे गटालाही इशारा देत आहेत. उद्धव ठाकरे या यात्रेसाठी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाचा वापर करत असल्याचंही सुरेश माने म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रेमागे अनेक कारणं आहेत. ही यात्रा ठाण्यातील टेंभी नाक्यापासून सुरू होणार आहे. शिवसेनेला पहिली सत्ताही ठाण्यातून मिळाली होती.

शिंदेंच्या गडातूनच उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा नारळ

त्यावेळी दिवंगत आनंद दिघेंचं ठाणे शहरावर वर्चस्व होतं. त्यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व वाढलं. आता शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असून अशात ठाण्यातून पहिली सभा घेत ते शिंदेंना इशाराच देत आहेत. उद्धव ठाकरे ठाण्यातली पहिली सभा टेंभी नाक्यावरच आयोजित केली आहे, जिथे आनंद दिघेंचं आश्रम आहे. या महाप्रबोधन यात्रेद्वारे उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यात आली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा हा प्रयत्न आता किती यशस्वी होतो हे जनतेच्या मतांमधूच समजेल.

यात्रेत प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाच्या वापर

   लोकांच्या भेटीगाठी, सभा, यात्रा उद्धव ठाकरेंनी खूप आधी केल्या असत्या तर आज परिस्थिती काही वेगळी असती असं वरिष्ठ जाणकारांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केल्यानंतर ठाणे शहरातील अनेक पदाधिकारी आणि बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या यात्रेत प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाच्या वापर केला आहे. आपल्या आजोबांच्या विचाराने या राजकीय यात्रेत सामील होत आहेत.

आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा

एकनाथ शिंदेंनी  उद्धव ठाकरेंची  साथ सोडत सर्वात मोठी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार, नगरसेवकही शिंदे गटात गेले. या संपूर्ण घडामोडींनंतर शिवसेना पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरेंनीही शिवसंवाद याद्वारे महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आणि अनेक शहरात धडाकेबाज भाषणं करत शिवसंवाद यात्रा यशस्वीही  केली. त्यांच्या यात्रेला मोठा प्रतिसादही मिळाला.



--------------


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने