उद्धव ठाकरेंचे एका बाणात दोन पक्षी! जळगावमध्ये म्हणाले..



ब्युरो टीम:
आमदारांनी बंड पुकारल्याचा घटनेला दीड महिना झाला आहे. अनेक आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिंदे गटात जणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. पक्षांतर करताना उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाही केला जात आहे. रळूरळू दुःख व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे भाजपकडून शिवसेना संपत चालले असल्याचे बोलले जात आहे. या सर्वांचा समाचार आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

    उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. ३) जळगावमध्ये शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदार माजी मंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर हल्लाबोल केला. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शपथपत्राचे व प्रतिज्ञापत्राचे गठ्ठे घेऊन जळगावमधील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीला भेट दिली होती.

    आज जळगावमधील शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्‍यावर हल्ला केला. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नवीन गुलाब फुलवीन, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी  नाव न घेता टोला लगावला. आपल्याला नवे गुलाब फुलवायचे आहे, असे म्हणत जळगावमधील कार्यकर्त्यांना नवीन उमीद दिली.

     शिवसेना  फोडण्याचे आजपर्यंत अनेकवेळा प्रयत्न झाले. परंतु, यावेळी शिवसेनेला संपविण्याचा कट रचला गेला. अशी कित्येक आव्हाने पायदळी तुडवत भगवा फडकवला आहे, अस म्हणत त्यांनी जे. पी. नड्डा यांना उत्तर दिले. तीन दिवसांपूर्वी नड्डा यांनी शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे, असे विधान केले होते. भाजपला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहे, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत म्हटले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने