ब्युरो टीम : पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज शुभारंभ करण्यात आला. विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे मंडळामार्फत म्हाडा च्या विविध योजनतील २७८ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज शुभारंभ झाला.
पुणे विभागाची म्हाडाची सोडत
पुणे विभागाच्या म्हाडाच्या घरांची सोडत आज पुण्यात पार पडली पुणे जिल्ह्यातील म्हाडाच्या 5211 घरासाठींची ही सोडत पुणे जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन उपस्थित पार पडली आहे.5211 घरासाठी म्हाडाकडे सुमारे 71 हजार 772 अर्ज आले होते त्यानुसार या घरांची सोडत अतिशय पारदर्शक रित्या पार पडल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या सोडतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थितांशी संवाद देखील साधला आहे.आपले सरकार हे सर्वसामान्यांना न्याय देणार असून सरकार हे सर्वसामान्यांचा मनातल सरकार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे.
जनतेचा शासनावर विश्वास : एकनाथ शिंदे
5211 लोकांना आज घरे मिळणार आहेत ही बाब खरच मोठी असून आपल्या म्हाडाच्या घरांसाठी एवढे अर्ज आल्याने जनतेचा शासनावर किती विश्वास आहे हे सिद्ध झालं असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितल आहे. या सोडतीची संपूर्ण यादी अर्जदारांना आज सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार असून ज्यांना घरी लागली आहेत त्यांना अधिकृत मेल पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे, अशी माहिती विजय ठाकूर यांनी दिली आहे.
सोडतीची यादी कधी पाहायला मिळणार
\ म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितामुसार आज सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर सोडतीची संपूर्ण यादी पाहायाला मिळेल.
टिप्पणी पोस्ट करा