अहमदनगर - सायबर पोलिसांनी माहिती घेऊन बारकाईने तपास करून फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळून दिले, तसेच अनेकांचे गैरसमज दूर करून त्यांना आत्महत्येपासून परावृत केले. सायबर पोलिसांनी नियमीत केलेल्या कठोर परिश्रमामुळे त्यांना यश मिळाले.
भविष्यकाळातही सायबर पोलीस दल अशाच प्रकारे उल्लेखनीय कामगिरी करुन पोलिस दलाची प्रतिमा उज्ज्वल करेल, असा विश्वास पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला.
वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सायबर पोलिस स्टेशनचे निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलिस नाईक अभिजीत अरकल व पोलीस शिपाई राहुल गुंडू यांचा स्नेहबंध फाउंडेशन तर्फे पोलिस अधीक्षक मनोज पाटील व स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला त्यावेळी पोलिस अधीक्षक पाटील बोलत होते. याप्रसंगी शिल्पकार बालाजी वल्लाल, हेमंत ढाकेफळकर उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, सायबर पोलिस स्टेशन येथील चांगल्या कामगिरीबाबत प्रशंसा करून त्यांच्याकडून आणखी चांगली कामगिरी घडो. सायबर पोलिस स्टेशन येथे येणारा प्रत्येक तक्रारदार हा काही तरी अपेक्षा घेऊन आलेला असतो. त्याची तक्रार एकूण त्याला योग्य ते मार्गदर्शन करून मदत करावी.
भारतातील प्रत्येक राज्यातील सायबर गुन्हेगार जेरबंद
सायबर चोरट्यांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नागरिकांचे ऑनलाइन पैसे हडपण्याचे प्रकार वाढत असले, तरी ऑनलाइन फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. सायबर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात संपूर्ण भारतातील प्रत्येक राज्यातील सायबर गुन्हेगार नगरच्या सायबर सेलने जेरबंद केले आहे, असे स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा