ब्युरो टीम : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार अनेक दिवसांपासून रखडला आहे. सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी शिंदे आणि फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरत नाही आहे. यावेळी शिंदे आणि फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये विस्ताराबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही मंत्रिमंडळात नाव असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार, अशी माहिती वृत्तांनी दिली. भाजपच्या नियमांनुसार एक व्यक्ती एक पद अशी जबाबदारी आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे मंत्री झाल्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर नसणार. त्यामुळे पुढील प्रदेशाध्यक्ष कोण? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे दिल्लीमधून सांगितले आहे. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनादेखील फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांच्या काळातही ३० ते ३२ दिवस फक्त पाच मंत्री होते, असे फडणवीस म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा