ब्युरो टीम: भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचं संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समिती नव्याने तयार केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंग चौहान आणि नितीन गडकरी यांना यामधून वगळण्यात आलं आहे. जे पी नड्डा संसदीय मंडळाचे आणि भाजपाच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. विशेष बाब म्हणजे निवडणूक समितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची चर्चा रंगली आहे.
दरम्यान निवडणूक समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भूपेंद्र यादव आणि ओम माथूर या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शाहनवाज हुसेन यांना निवडणूक समितीमध्ये स्थान मिळालेलं नाही. दुसरीकडे सोनेवाल आणि येडियुरप्पा यांना दोन्ही ठिकाणी स्थान मिळालं आहे.
येडियुरप्पा, सत्यनारायण जातिया आणि के लक्ष्मण यांना संधी देत भाजपाने आपण आपले जुने कार्यकर्ते आणि त्यांच्या अनुभवाचा किती आदर करतो हे दाखवून दिल्याचं भाजपा सूत्रांचं म्हणणं आहे. यासोबतच भाजपाने फेरबदल करताना विविधतेवर भर दिला असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. ईशान्येतून सर्बानंद सोनेवाल यांना संधी देण्यात आली असून, एल लक्ष्मण आणि बीएस येडियुरप्पा हे दक्षिणेतील आहेत.
टिप्पणी पोस्ट करा