महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने श्री ब्रिजेश वनितलाल शहा यांना अटक केली आहे. ओम इम्पेक्स आणि इतर दोन कंपन्या संबंधीत केलेल्या कारवाईत आज 04.08.2022 रोजी हि कारवाई केली आहे.
ओम इम्पेक्स या कंपनीच्या व्यवसायाच्या ठिकाणी तपासणी भेट देण्यात आली असता प्राथमिक तपासात असे आढळून आले की मे. ओम इम्पेक्स आणि इतर दोन कंपन्या, मेसर्स ब्रिजेश्वरी एंटरप्रायझेस आणि मेसर्स चेतना मेटल्स एलएलपी यांनी रु. 41.67 कोटीचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) हे 231.49 कोटी रुपयांच्या बनावट बिलांद्वारे घेतले आहे.
या कारवाईत महानगर दंडाधिकारी न्यायालयाने श्री. ब्रिजेश वनितलाल शहा याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई श्री. राहुल द्विवेदी (IAS), सहआयुक्त राज्य कर, अन्वेषण-A, मुंबई आणि श्री. नीळकंठ घोगरे, राज्य कर उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य कर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. संतोषकुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यात राजपूत यांच्यासह श्री.अमोल सुर्यवंशी व सौ.लीना काळे यांनी सहभाग नोंदवला.
आजच्या कारवाईसह, राज्य जीएसटी विभागाने चालू आर्थिक वर्षात एकूण तीस जणांना अटक केली आहे. तसेच असे प्रकार टाळण्यासाठी रमहाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग सर्वसमावेशक विश्लेषणात्मक साधने आणि आंतर-विभागीय समन्वय राज्यभर वाढवणार आहे ज्यामुळे फसवणूक करणार्यां लोकांविरुद्धची मोहीम मजबूत होईल.
|
टिप्पणी पोस्ट करा