''आम्ही गद्दार नाही खुद्दार आहोत. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांच्याशी आम्ही फारकत घेतली. आम्हाला भाडोत्री फौजेची गरज नाही. मला कंत्राटी मुख्यमंत्री म्हटले. पण, राज्याच्या विकासाचे कंत्राट मी घेतले, राज्य समृद्ध करण्याचे, गोरगरीबांचे अश्रू पुसण्याचे, बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा जपण्याचे कंत्राट मी घेतले. असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा.'' असा टोलाही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. गेले 5 दिवस वादळी ठरल्यानंतर आज अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. यात तब्बल 23 लक्षवेधी सूचना विरोधकांकडून मांडण्यात आल्या आहेत. तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे या विरोधकांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर निवदेन केले.
काँंग्रेसवर मुख्यमंत्र्यांची कवितेतून टीका
काँग्रेसची स्थिती पाहून येते दया
''महाविकास आघाडीची पुरती गेली रया
दादा आणि अंबादास बसले
काँग्रेसवाले हात चोळत बसले
ईकडे हे आणि वरती अंबादास
त्यावेळी इंदिराबाईची किती होती वट
टोमणेसेनेसोबत आता नुसती झाली फरपट''
अशी मिश्किल कविता मुख्यमंत्र्यांनी केली. माझ्यावर रोज आरोप केले जातात. मला गद्दार म्हणतात, कुणी काय नी कुणी काय. तीन दिवस गद्दार आणि खोके चालले होते, पण तुम्ही पण पोराटोरांसोबत उभे राहीले. फिफ्टी-फिफ्टी बिस्किटासारखे. रोहितही मागे होता. वरचा मिटकरीही तिथे आला आणि कळ काढत होता. आमच्या घोषणेनंतर तिथे जायला हवे होते.
राष्ट्रवादी, काँग्रेस शत्रू
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्हाला रोज गद्दार म्हणता, पण आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. राष्ट्रवादी, काॅंग्रेसने वाईट वाटून घेण्याची गरज नाही. बाळासाहेब म्हणायचे की राष्ट्रवादी, काँग्रेस आपले शत्रु आहे, त्यांना जवळ करु नका, त्यांना जवळ करायचे असल्यास मी दुकान बंद करेल.
बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी नाहीच
मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही युती म्हणून निवडून आलो. बाळासाहेबांचा फोटो लावला, मत मागीतली. लोकांना युतीकडून अपेक्षा होती पण त्यांच्या विचारांशी गद्दारी कुणी केली हे सांगतांना त्यांचा रोख शिवसेनेकडे होता. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही.
आम्ही गद्दार नाही खुद्दार
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही गद्दार नाही खुद्दार आहोत. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांच्याशी आम्ही फारकत घेतली. आम्हाला भाडोत्री फौजेची गरज नाही. माझा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून झाला पण राणेंना जेवण करु न देता जेलमध्ये टाकले. त्यांना जेलमध्ये का टाकले तर मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द वापरले म्हणून..पण आम्ही नियमाविरोधात काहीही आणि कोणतेही कृत्य करणार नाही. अध्यक्ष कायदातज्ज्ञ आहे ते वाकडे तिकडे काम करु देणार नाही.
उद्धव ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री म्हणाले, राज्याच्या विकासाचे कंत्राट मी घेतले, राज्य समृद्ध करण्याचे, गोरगरीबांचे अश्रू पुसण्याचे कंत्राट मी घेतले. बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा जपण्याचे कंत्राट मी घेतले. असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा असा टोलाही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अजित पवारांची दाद
मुख्यमंत्री म्हणाले, ठाण्यातील डान्सबार बंद आहे ते पुर्वीचे व्हिडीओ क्लिप होते. ते माझ्या नव्हे तुमच्याच काळातील होते. तुम्ही तिकडे होता असे सांगताच सभागृहात हशा पिकला अन् अजित पवारांनीही हात जोडत मुख्यमंत्र्यांच्या मिश्किल टीकेला दाद दिली.
आव्हाडांचे दुसरे सांगू का?
मुख्यमंत्री म्हणाले, डान्सबार चालु होते तेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती. जितेंद्र आव्हाड तिकडे होते मी त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही. तुम्ही डान्सबार बघायला जाता हे मी सांगत नाहीये. तुमच्याबद्दल चांगले बोलणे हेही वाईट आहे का, तुमच्या बद्दल वाईट बोलु का, दुसरं सांगु का तुमचं असे मुख्यमंत्री बोलताच सभागृहात हशा पिकला.
ज्येष्ठांच्या गुन्ह्याबाबत गंभीर
राज्यातील अपहणाच्या घटनेत आणि गुन्ह्यात वाढ झाली आहे. डान्सबारवर आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत. तसेच ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशिल असून शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ज्येष्ठांवरील गुन्ह्यांचा आलेख
मुख्यमंत्री म्हणाले, ज्येष्ठ नागरीकांच्या फसवणुकीच्या प्रकाराचा विचार केल्यास 2019 मध्ये 988 2020 मध्ये 798 आणि 2021 मध्ये 1850 गुन्हे दाखल आहेत. ज्येष्ठ नागरीकांची फसवणूक आणि दाखल गुन्ह्याला महत्व दिले जात असून 1090 हि हेल्पलाईन ज्येष्ठांच्या मदतीसाठी आहे.
राज्याचा अकरावा क्रमांक
मुख्यमंत्री म्हणाले, देशात गुन्ह्यांच्या आकेडवारीत राज्याचा अकरावा क्रमांक लागतो. राज्यातील गुन्हे प्रगटीकरणात वाढ झाली आहे. मोक्का, एमपीडीएखाली कारवाया केल्या जात आहेत.
महिलांवरील गुन्ह्यात वाढ
मुख्यमंत्री म्हणाले, अल्पवयीन मुले , मुली महिलांवरील अत्याचाराचे 2022 पर्यंत 22 हजार 509 एकुण गुन्हे दाखल आहेत. जून 2019 च्या तुलनेत वाढ झाली. पती, नातेवाईकांकडून छळ, महिलांची छेडछाड, अपहरणात वाढ झाली.
ठाणे, कापूरबावडीत डान्सबारबाबत कारवाई करण्यात आली आहे. जून 2022 पर्यंत 85 गुन्हे दाखल आहेत. 1 हजार 605 जणांवर कारवाई केली. 2021 पर्यंत 59 गुन्हे दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी वाचला क्राईम रेकाॅर्ड
प्रत्येक गुन्हा दाखल व्हावा.
गुन्हे कमी दाखवण्यासाठी गुन्हे दाखल न करणे हा पर्याय परवडणारा नाही.
2015 ते आजपर्यंत 11 मुस्कान ऑपरेशन
मुस्कान ऑपरेशनद्वारे 37 हजार 511 मुलांचा शोध घेण्यात आला.
पोलिसांच्या बेदरकार वृ्त्तीतून गोंदियात महिलेवर अत्याचार.
यात तीन आरोपीपैकी दोघांना अटक केली.
पीडितेला मनोधैर्य योजनेतून अकरा हजारांची मदत झाली.
बीड येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी दोन आरोपींना अटक, दोषारोपपत्रही सादर
ठाणे महिला पोलिसाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस अमलदाराचा पतीला अटक
टिप्पणी पोस्ट करा