नागपूर :- दुबईनंतर
जगातील सर्वांत उंच कारंजी आता नागपूर शहरातील फुटाळा येथे करण्यात आले आहे. तसेच
१५ ऑगस्टला मोठ्या प्रमाणात हा संगीतमय कारंजी प्रकल्प दाखवण्यात आला होता. तसेच
देशातील पहिल्या सर्वांत उंच अशा नागपूर येथील फुटाळा तलावातील ‘संगीतमय कारंजी
आणि लाईट शो’ प्रकल्पाला गानसम्राज्ञी भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांचे नाव
देण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले,
या प्रकल्पाचे उद्घाटन राजकीय पुढाऱ्यांच्या
हस्ते न करता देशातील श्रेष्ठ कलावंताकडून केले जाणार. दिवंगत लता मंगेशकर यांची
संगीत क्षेत्रातील कामगिरी अतुल्य आहे. म्हणूनच त्यांचे नाव कारंजी प्रकल्पाला
देण्याचा विचार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा
झाली आहे, असेदेखील ते म्हणाले.
गडकरी यांच्या संकल्पनेतून फुटाळा तलावात संगीतमय कारंजी प्रकल्प साकार झाला आहे.
-----------
टिप्पणी पोस्ट करा