सर्व राज्यकर्त्यांना बुद्धी दे; छगन भुजबळ यांचे साकडे

 


मुंबई : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गणेशोत्सवाचे रुप पालटून गेले होते. यंदा गणेशोस्तव धुमधडाक्यात साजरा होत आहे. तसेच सामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत जोरदारपणे गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी गणेशाकडे सर्व राज्यकर्त्यांना बुद्धी दे असे साकडे बाप्पांकडे त्यांनी घातले आहे.

        माहितीनुसार, यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यांना या संकटातून सावरण्याचे बळही मिळावे असेदेखील साकडे त्यांनी गणरायाकडे घातले आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांना शक्ती दे, बुद्धी दे अशीही मागणी यावेळी छगन भुजबळ यांनी केली आहे.

------------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने