मुंबईतलं प्रसिद्ध ललित हॉटेल उडवण्याची धमकी देणाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या,



     मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेल उडवून देण्याची धमकी देऊन 5 कोटींची मागणी करणाऱ्या एका संशयिताला मुंबई पोलिसांनी गुजरातच्या वलसाड येथून केली अटक केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीची मानसिक स्थिती स्थिर आहे. आरोपींनी हॉटेल प्रशासनाकडे पहिल्या कॉलमध्ये 5 कोटी मागितले होते आणि नंतर तडजोड करून 3 कोटींची मागणी केली होती

           सहार पोलिसांनी आरोपीच्या शोधात गुजरात गाठले आणि त्याला वलसाड येथून ताब्यात घेतले. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या लोकांनी गुगलवरून ललित हॉटेलचे नंबर काढले होते आणि बॉम्बची धमकी दिली होती. ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही संशयित आरोपींनी मानसिक त्रास झाल्याचे भासवले. मात्र तो पूर्णपणे निरोगी आहे. बॉम्बची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्या मागे त्याचा खरा हेतू काय होता? याची चौकशी करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोटी सापडल्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ही घटना ताजी असताना मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला (Lalit Hotel in Mumbai ) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी अज्ञाताने दिली होती. धक्कादायक म्हणजे, मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेलाच याबद्दल धमकीचे मेसेज पाठवण्यात आला होता. यामुळे खळबळ उडाली होती.

         गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक धमकीचा मेसेज मिळाला होता. यामध्ये मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे फोन करून सांगितले, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

         अज्ञात व्यक्तीने सोमवारी संध्याकाळी 6 वाजता हॉटेलमध्ये फोन करून बॉम्ब ठेवला असल्याची धमकी दिली होती. हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवले आहे.  जर बॉम्बचा स्फोट घडवायचा नसेल तर 5 कोटींची खंडणी मागितली. या अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्यामुळे हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. सर्वत्र शोधाशोध सुरू झाला. हॉटेल व्यवस्थापकांनी तातडीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली होती.

------------


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने