भाजपाला संघाची विचारसरणी मान्य आहे का - उद्धव ठाकरे

 


       राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. शिंदे गटाने बंग पुकारल्यानंतर शिवसेनेने संभाजी ब्रिगेडचा हात पकडला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज या युतीची घोषणा केली. दरम्यान, त्यांनी भाजवरही हल्लाबोल केला

      उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीची घोषणा केली. आणि भाजपवर निशाणा साधत संघाची विचारधारा भाजपला मान्य आहे का? असा सवाल उपस्थित केला.

      आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत युती केली होती. भाजपचा पितृपक्ष असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक विचार आहे, पण त्या संघाचाच विचार भाजप मानत नाही. संघाची विचारसरणी भाजपला मान्य आहे का? त्याप्रमाणे वागत आहेत का? असे सवाल ठाकरेंनी यावेळी भाजपला उपस्थित केला

       तसेच, मोहन भागवतांनी गेल्या काही वर्षात जी मते मांडली आहेत, त्याप्रमाणे भाजप काम करत आहे का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे विचारधारा वगैरे आम्हाला विचारण्याऐवजी त्यांना विचारावी,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने