सायबर गुन्ह्यांबाबत जागृती गरजेची : पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे




अहमदनगर - मोबाइल क्रांतीच्या  युगात मोबाइल व इंटरनेट आज प्रत्येकाची गरज बनली आहे. त्यातून व्हाट्सअप, फेसबुक व इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. त्यातूनच मोबाइल युजरचा अॅक्सेस वापरून हॅकर किंवा सायबर गुन्हेगार विविध प्रकारचे गुन्हे करून नागरिकांची आर्थिक लुट करण्याचा प्रयत्न करत असतात. सायबर गुन्हे का घडतात याची जागृती होणे गरजेची आहे, असे प्रतिपादन अहमदनगर सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक सचिन रनशेवरे यांनी केले.

छावणी परिषद शाळेत स्नेहबंध सोशल फौंडेशन आणि सायबर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राइमवर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.


कार्यक्रमाला स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, मुख्याध्यापक संजय शिंदे, मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, सायबर सेलचे राहूल गुंडू, पोलीस नाईक अभिजीत अरकल, मुबीना सय्यद आदी उपस्थित होते.

 उपनिरीक्षक रनशेवरे म्हणाले, असे प्रकार कुणाबरोबर होऊ नयेत याकरिता पोलिसांचा सायबर सेल सातत्याने मार्गदर्शन करत असतो. सायबर गुन्हे का घडतात. ते घडू नयेत म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

   सायबर सेलचे अभिजीत अरकल यांनी सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्याकरिता मोबाइल युजरनी काय करायला हवे याविषयी मार्गदर्शन केले.

  सायबर सेलचे राहूल गुंडू यांनी सायबर गुन्हेगार हे ठराविक भागात कार्यरत आहेत. अशा प्रकारच्या गुन्हेगारीच्या माध्यमातून त्यांचे नेटवर्क प्रत्येक भागात कार्यरत आहे. हा प्रकार कुणाबरोबर घडू नये म्हणून प्रत्येकाने कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

   'स्नेहबंध'चे अध्यक्ष उद्वव शिंदे यांनी 'स्नेहबंध' करत असलेल्या सामाजिक शैक्षणिक कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी, सुत्रसंचालन महेश भगत यांनी, तर आभार अरविंद कुडिया यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने