बोटीतील शस्त्रास्त्रांबाबत तपास नवी मुंबई एटीएसकडे; दहशतवादी धागेदोरे असल्याचा संशय



नवी मुंबईः रायगड जिह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रात दोन दिवसांपूर्वी शस्त्रांस्त्रांसह सापडलेल्या बोटीचा तपास आता दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटकडे सोपविण्यात आला आहे. ओमान येथून ही बोट भरकटत आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असले, तरी बोट आणि त्यातील शस्त्रे यांचे दहशतवादी धागेदोरे असल्याच्या संशयावरून या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात आल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.

      रायगड जिह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर गुरुवारी सकाळी आढळून आलेल्या संशयास्पद बोटीमध्ये तीन एके-४७ रायफली आणि जिवंत काडतुसांचा बॉक्स सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यात 'हाय अॅलर्ट' जारी करण्यात आला. पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबईतील २६/११ हल्ल्याच्या वेळी दहशतवादी रायगडमधील समुद्रातून शस्त्रास्त्रे घेऊन उतरल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे ओमान येथून ही बोट भरकटत आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असले, तरी या बोटीत एके-४७ रायफली आणि जिवंत काडतुसांचा बॉक्स सापडल्याने त्यामागे दहशतवादी धागेदोरे आहेत का, याचा तपास करण्यात येत आहे. त्यासाठी या प्रकरणाचा पुढील तपास दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटकडे सोपविण्यात आला. त्यानुसार नवी मुंबई एटीएसच्या पथकाने एके-४७ रायफली, जिवंत काडतुसे व इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.

सागरी किनाऱ्यावर कडक सुरक्षा व्यवस्था

      या घटनेनंतर महाराष्ट्रात 'हाय अॅलर्ट' जारी करण्यात आला. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून किनारपट्टीवर नाकाबंदी करण्यात आली. नवी मुंबई पोलिसांकडूनदेखील किनाऱ्यावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच आपल्या हद्दीतील समुद्रात तीन बोटींच्या सा

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने