अजित पवारांचा निशाणा तेच... रात्री उशिरापर्यंत फिरतात, पोलिस तरी काय करणार.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार आज चांगलाच निशाणा साधला. बारामतीतील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार का होत नाहीए? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसंच हे सरकार आधीच्या सरकारच्या प्रत्येक निर्णयाला स्थगिती देण्याचे काम करत आहे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.
           तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणारी अधिकारी व्यक्तीच जर नियम मोडत असेल तर कसे चालेल. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रात्री उशिरापर्यंत होत असणाऱ्या दौऱ्यांबाबत त्यांनी टीका केली. आपण जेव्हा पदावर असतो तेव्हा, नियम मोडून चालत नाही. रात्री दहाच्या पुढे लाउडस्पीकर बंद. मात्र मुख्यमंत्री फिरत असताना रात्री एक दोन वाजेपर्यंत स्पीकर चालू असतात. पोलिसांना सांगावं तर पोलिसांना आदेश देणारेच नियम मोडत असतील तर पोलीस तरी काय करणार.
           ते पुढे म्हणाले आम्ही पोलिसांना विचारले तर ते म्हणतात... दादा आमच्या घड्याळात अजून दहा वाजलेच नाही. त्यांच्याकडे दुसरे उत्तरही नाही. पोलीस तरी कसे म्हणू शकतील रात्री दीड वाजला तरी मुख्यमंत्री बोलतात. त्याला आम्ही काय करायचं? नाही तर व्हायची बदली. अशी पोलिसांची अवस्था असुन याबाबत मी राज्यपालांना बोललो आहे. आपल्याकडे अधिकार असतील तरी मात्र संविधानाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे त्याचे पालन केले पाहिजे. मग ती सामान्य व्यक्ती असो की उच्च पदस्त, असे म्हणत रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने