ब्युरो टीम: दापोली येथील अनिल परब यांचं अनधिकृत साई रिसॉर्ट गणेशोत्सवानंतर पाडण्यात येणार असून, येत्या दीपावलीपर्यंत महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराचे स्मारक जमीनदोस्त झालेले असेल, असा विश्वास भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी व्यक्त केला आहे. सोमय्यांच्या या दाव्यानंतर खरंच परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी अनिल परबांच्या अनधिकृत ट्वीन रिसॉर्टना तोडण्याचा आराखडा जाहीर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग टेंडर व पाडण्याचा तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचेही ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील या रिसॉर्टच्या बांधकामात अनियमितता असल्याचा तसेच याच्या बांधकामासाठी गैर व्यवहारातील पैसा वापरण्यात आला आहे. नोएडातील ट्विन टॉवर पाडले त्याप्रमाणेच दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यात येणार असून, हे कोणत्या तंत्रज्ञानाने पाडायचे हेदेखील लवकरच ठरेल, असे सोमय्या म्हणाले.
रिसोर्ट पाडण्याचे कंत्राट आणि ते पाडल्यानंतर होणाऱ्या मलब्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट कुणाला द्यायचे याची प्रक्रिया सुरू असून, गणपतीच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर गणपतीनंतर हे तोडण्याची कारवाई केली जाईल अशी आशा आहे. दरम्यान, याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन परब आणि नार्वेकरांच्या अनधिकृत पाडलेल्या बांधकामाजवळ बॅनर लावून महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला जागा नाही असे फलक लावण्याची विनंती करणार असल्याचेही सोमय्यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा