मुंबईत संस्कार व्हॅलीच्या मुलांकडून ‘परवाज का आगाज’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित नाटक सादर

 

ब्युरो टीम: भोपाळ येथील संस्कार व्हॅली स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित नाटक ‘परवाज का आगाज’ शुक्रवारी मुंबईतील प्रतिष्ठित नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट््स-टाटा थिएटरच्या निमंत्रणावरून सादर केले. नाटकाची संहिता प्रसिद्ध गीतकार-शायर गुलजार यांनी लिहिलेली आहे. नाट्यप्रयोगाला गुलजार, संगीतकार शांतनू मोईत्रा यांची उपस्थिती होती. मुंबईतील ९०० प्रतिष्ठित पाहुणे व विविध शाळांतील विद्यार्थ्यांसमोर हा प्रयोग सादर केला. ५८ मिनिटांच्या या ऐतिहासिक प्रयोगादरम्यान रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त दाद दिली.

         हा नाट्यप्रयोग यशस्वी राहिला. त्यात संस्कार व्हॅॅली स्कूलची ६६ मुले व शिक्षक सहभागी झाली होती. संस्कार व्हॅली स्कूलच्या िवद्यार्थ्यांनी ‘परवाज का आगाज’चा प्रयोग तीन वर्षांपूर्वी भोपाळमध्ये केला होता. तेव्हा गुलजार यांनी हे नाटक देशातील इतर शहरांत सादर करावे. त्यामुळे देशातील मुले-तरुणांना प्रेरणा मिळेल, असा मौलिक सल्ला दिला होता. त्यापासून प्रेरणा घेऊन संस्कार व्हॅली स्कूलने गुलजार यांच्या संहितेवर आधारित ‘परवाज का आगाज’चा पहिला नाट्यप्रयोग मुंबईत आयाेजित केला. लवकरच देशातील इतर शहरांतदेखील ते सादर केले जाईल.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने