शरद पवारांच्या नातीची ग्लोबल कामगिरी; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये…


मुंबई : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नात देवयानी पवार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये  चमकणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या ‘ग्लोबल शेपर्स ॲन्युअल समिट’मध्ये देवयानी पवार ग्रामीण भागातील प्रतिनिधित्व करण्याची भूमिका बजावणार आहे.

         २०२०मध्ये स्थापन झालेल्या ‘ग्लोबल शेपर्स कम्युनिटी’च्या बारामती हबमध्ये क्युरेटर म्हणून काम पाहणाऱ्या देवयानी पवार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सप्टेंबरमध्ये जिनिव्हा येथे होणाऱ्या समिटमध्ये भाग घेणार आहे. मी ३० वर्षाखालील युवा नेत्यांच्या मंचावर ग्रामीण भागाचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणार आहे. ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. मी माझे अनुभव समिटमध्ये सांगणार आहे, जे मला ग्रामीण लोकांसोबत काम करताना आले आहेत. त्यामुळे मी या कार्यक्रमात सहभागी होण्यास उत्सुक आहे, असे देवयानी पवार यांनी म्हटले आहे.

         माझ्यासाठी, ग्रामीण युवक, स्थानिक प्रशासन आणि खाजगी संस्थांना एकत्रितपणे सहभागी करून सर्वसमावेशक, प्रगतिशील बनवून माझ्या समुदायावर प्रभाव पाडणे आणि प्रभाव निर्माण करणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मला वाटते की, अशा प्रकारे भारत देश आणि त्यातील तरुण प्रगती करतील आणि अडथळे दूर करतील, असेही देवयानी पवार म्हणाल्या. या परिषदेमध्ये देवयानी पवार या ६०० पेक्षा जास्त जागतिक स्तरावर काम करणाऱ्या लोकांसोबत विचारमंथन करणार आहेत. तसेच भविष्यातील सहयोगासाठी आणि प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यांच्यासोबत मिळून काम करणार आहेत. बारामती हबने केलेल्या उल्लेखनीय उपक्रमांपैकी सॅनिटरी पॅडचे वाटप आणि स्थानिक प्रशासन संस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहीम या दोन्हींचा समावेश या परिषदेमध्ये आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने