बाळासाहेब, दिघेंचा वारसा कोण चालवणार हे जनताच ठरवेन; राजन विचारेंचे शिंदेंना आव्हान- राजन विचारे


ठाणे : आनंद दिघे आजही आहेत, ते सर्व काही बघत आहेत, त्यामुळे येत्या काळात तेच याचे उत्तर देतील आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना योग्य शिक्षा देतील. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा कोण चालवणार हे आगामी निवडणुकीत जनताच ठरवेल, असा इशारा शिवसेना खासदार राजन विचारे  यानी एकनाथ शिंदेगटाला दिला.

        स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित त्यांनी आज शक्तिस्थळावर दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा प्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर, अनिता बिर्जे आदिसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

       यावेळी माध्यमांशी चर्चा करताना विचारे म्हणाले, दिघे साहेब यांच्या आशीर्वादामुळेच आमच्या सारखा सर्व सामान्य कार्यकर्ता मोठ्या पदापर्यंत पोहोचला आहे. दिघे हे चारअक्षरांसाठी शेवटपर्यंत जगले. कोण कोणाच्या हृदयात आहे हे आता येत्या निवडणुकीत जनताच दाखवून देईल. फोटो हे काल्पनिक असतात, फोटोमध्ये न राहता दिघे यांनी जनतेच्या हृदयात राज्य केले आहे. शिवसेनेने पहिली सत्ता ठाण्यातून मिळवली. ठाणेकर हे सुज्ञ आहेत त्यामुळे ते योग्य तोच निर्णय घेतील. त्यांना अभिवादन करण्यासाठी आता जे काही घडलेलं आहे जे काही झालेलं आहे ते कोणत्याही शिवसैनिकाला पटलेले नाही. आज जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते लोक बघत आहेत त्यामुळे त्याचा हिशेब ही जनताच करेल.

------------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने