ब्युरो टीम:महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संलग्न असलेले कारवां भारताच्या बहु-सांस्कृतिक वारशाचा, अनपेक्षित आणि असंख्य आकर्षणांचा शोध घेणारा हा एक नवीन उपक्रम आहे. पर्यटक आता पोर्टेबल व्हेकेशन होम्स म्हणून काम करणाऱ्या कारवां बुक करू शकतात, जे सोयीस्कर आहे. कारवां लाइफमध्ये प्रवासी कॅरॅव्हन पार्क बुक करू शकतात, डील करू शकतात. सर्व कारवाँ पर्यटन संबंधित सेवा एकाच छताखाली मिळवू शकतात. याविषयी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, caravaanlife.com भारतात आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे.
अलीकडच्या वर्षांत पर्यटनावरील घरगुती खर्चात लक्षणीय वाढ झाली आणि २०२८पर्यंत सुमारे ९० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. आउटडोअर पिकनिक, निसर्ग मुक्काम, वसतिगृहे आणि बीएनबी मुक्काम यांचा वाढता कल हे भारतातील पर्यटन बदलाच्या तयारीत असल्याचे चांगले संकेत आहेत. पर्यटन मंत्रालयाने कारावां आणि कारवां कॅम्पिंग पार्क्सचा विकास आणि संवर्धनासाठी एक विशिष्ट धोरण तयार केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा