हे सरकार लोकशाहीचा खून करीत आहे: अजित पवार

 


पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने `निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा` मेळाव्याचे चिंचवड येथे आयोजन केले होते. यात बोलताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा चांगलाच समाचार घेतला.  ते म्हणाले 'गेल्या ३५ दिवसांपासून दोघेच जण कारभार करीत आहेत, मंत्रिमंडळ स्थापन करण्यात का विलंब होत आहे? तेच समजत नाही. फुटलेल्या आमदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता येत नसावी, अशी शंका मनात येते. दोघांनी पदे घ्यायची. दिल्ली वाऱ्या करायच्या आणि बाकीच्यांनी वाट पहायची. सचिवांना अधिकार देऊन दोघे `टिकोजीराव` दिल्ली वाऱ्या करीत आहेत. हा कसला कारभार?`

पुढे त्यांनी सांगितले सर्व विभागाच्या मंत्र्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या संबंधित सचिवांकडे सोपवल्या बाबतचा आदेश मुख्यमंत्र्यांनी चार ऑगस्टला काढला. त्यानंतर आज सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, हे काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित करून पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार लोकशाहीचा खून करीत आहे, असा आरोप केला. मंत्रालयाचे नाव सचिवालय करा, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने