औरंगाबाद, उस्मानाबाद शहरासह नवी मुंबई विमानतळ नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर



मुंबईः विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातआज अखेरच्या दिवशी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यापैकीच एक म्हणजे औरंगाबाद (, उस्मनाबाद  शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. आधी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे-भाजप सरकारने हा प्रस्ताव अवैध ठरवत नव्याने त्याला मंजुरी दिली. त्यानंतर आता नामांतराच्या प्रस्तावाला पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव करण्यावरून काही संघटनांचा आक्षेप आहे. एमआयएमचाही यास तीव्र विरोध आहे. मात्र नामांतराची प्रक्रिया आता आणखी एक पाऊल पुढे सरकल्याचे दिसून येत आहे. या दोन शहरांसोबत नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील विमानतळ असे नामांतर करण्याच्या ठरावालाही मंजुरी देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने