ब्युरो टीम: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर थेट पोलीस तक्रार झाली आहे. औरंगाबादमधील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी नियम आणि कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच या तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान, रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर बंद करण्याचा नियम आहे. आम्ही सर्वच जण पदावर असलो,नसलो तरी हा नियम पाळतो. मुख्यमंत्र्यांनीही तो पाळावा असा संकेत आहे. असे असतानाही मुख्यमंत्रीच जर असे काही करत असती तर काय बोलायचे, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौऱ्यांमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर बंद ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमादरम्यान हे आदेश धुडकावून लावले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा तसेच, कायद्याचाही भंग झाला आहे. परिणामी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.
आनंद कस्तुरे यांनी ही तक्रार तक्रार दाखल केली आहे. कस्तुरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवला गेला नाही. मात्र, तक्रारीची दखल घेऊन चौकशी केली जाईल असे पोलिसांनी म्हटल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा