मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा पार पडत असतानाचा मंत्रिमंडळात पूजा चव्हाण प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीच्या नेता चित्रा वाघ यांनी राठोड यांना मंत्रीपद देणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. राठोड यांनी शपथ घेतल्याच्या काही वेळातच चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली.
|
|
मूळची बीड जिल्ह्यातील परळीच्या असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. पूजाने पुण्यातील मोहम्मदवाडी भागातील हेवन पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली. पूजासोबत राहणाऱ्या दोन जणांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान तिला मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणावरून राज्यात प्रचंड गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं होतं. |
टिप्पणी पोस्ट करा