ब्युरो टीम: ब्राह्मण सभागृह येथे रविवारी पार पडलेल्या या व्याख्यानात सावरकर अभ्यासक ज्येष्ठ वक्ते शरद पोंक्षे यांनी सावरकरांविषयी आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी हिंदू समाजसंदर्भात परखड मत व्यक्त केलं आहे.
'अहिंसा परमो धर्म: यामध्ये केवळ अर्धाच श्लोक आम्हाला शिकवला गेला. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि या सर्वश्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र उचलणे हा त्याही पेक्षा मोठा धर्म आहे हे आम्हाला शिकवलं नाही. अहिंसा सारखं दुसर शस्त्र नाही. अहिंसा परमो धर्म: चे एवढे ढोस आम्हाला पाजले की हा हिंदू समाज अहिंसक होता होता नपुसंक कधी झाला हे आम्हाला कळलचं नाही', असे परखड मत पोंक्षे यांनी यावेळी व्यक्त केलं.
'राष्ट्राला सर्व विचारांची गरज असते पण ती तेवढ्याच प्रमाणात. हिंदूस्थान हा हिंदूंचा आहे, यामध्ये कम्युनिझम, समाजवाद हवा तो नसून चालत नाही. पण त्यांचे प्रमाण ठरलेले आहे हे त्या राजाला कळते जो सुसंस्कृत असतो. तो कधी कोणते उपोषण होऊ देत नाही. उपोषण हा कधीच मार्ग नाही उपोषण तेव्हाच यशस्वी होते जेव्हा राजा सुसंस्कृत असतो. सुसंस्कृत राजा असणे म्हणजे काय ? एक प्रभू श्रीरामांचे रामराज्य व दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य असे राज्य चालविणारा राजा असावा असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे.
हिंदी राष्ट्रवाद हा अत्यंत घात आहे, मुस्लिम लांघुलचालन हे अत्यंत घातक आहे, हे दोन मुद्दे जोपर्यंत कॉंग्रेस सोडत नाही तोपर्यंत हा सावरकर कॉंग्रसमध्ये कधीही येऊ शकत नाही. आदि विचार मांडत त्यांनी कॉंग्रेस सरकारने हिंदूत्वापासून कसे सगळ्यांना दूर केले, परंतू आता खरे दिवस यायला लागले आहेत असंही ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा