आधी फक्त ५ महिने मंत्री राहिलेल्या 'या' नेत्याला पुन्हा संधी नाही? , फडणवीसांच्या तोडीचा नेता मंत्रिमंडळा बाहेर? प्रदेशध्यक्षपदासाठी नाव चर्चेत


मुंबई: राज्यात सरकार स्थापन होऊन तब्बल सव्वा महिना उलटल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. संबंधित खात्यांचे मंत्री आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यामुळे जनतेची अनेक कामं खोळंबली आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिशेनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होण्याची शक्यता आहे.

        शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात १५ ते १७ जणांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपकडून ८ नावं चर्चेत आहेत. त्यात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, बबनराव लोणीकर, प्रविण दरेकर, रविंद्र चव्हाण, नितेश राणेंची नावं आघाडीवर आहेत. आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं

        मुंबई भाजपमधील महत्त्वाचा चेहरा अशी शेलार यांची ओळख आहे. मराठा नेता, टास्कमास्टर, सर्वपक्षातील नेत्यांशी उत्तम संबंध या शेलारांच्या जमेच्या बाजू आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळी शेलार यांना शिक्षण मंत्रिपद देण्यात आलं होतं. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर आरोप झाल्यानं त्यांना मंत्रिपदावरून दूर करण्यात आलं. त्यांच्या जागी शेलारांना संधी देण्यात आली. १६ जून २०१९ ते १२ नोव्हेंबर २०१९ दरम्यान शेलारांकडे मंत्रिपद होतं.

         भाजपमधील महत्त्वाचा मराठा चेहरा म्हणून आशिष शेलार ओळखले जातात. फडणवीसांच्या तोडीचे नेते अशी त्यांची राजकीय वर्तुळातील ओळख आहे. त्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम असताना भाजपनं एकनाथ शिंदेंच्या रुपात मराठा मुख्यमंत्री दिला. आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदीही शेलारांच्या रुपात मराठा चेहरा दिला जाऊ शकतो.

           आशिष शेलार विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. २०१२ ते २०१४ या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये ते मुंबईच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. ही निवडणूक शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढवली. शिवसेनेला बालेकिल्ला असल्यानं भाजपसमोर आव्हान होतं. शेलार यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत भाजपनं ३१ वरून ८२ वर उडी मारली. शिवसेनेनं ८४ जागा जिंकल्या. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपनं मिळवलेल्या यशात शेलारांचा सिंहाचा वाटा होता.

 

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने