'आता राजकीय प्रदुषण बंद झालं' मुख्यमंत्री शिंदेंचा शिवसेनेला टोमणा


  


 ब्युरो टीम: 'मेट्रो 3 सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील गाड्यांची संख्या कमी होईल, प्रदुषण कमी होईल. आता राजकीय प्रदुषण पण आता बंद झालं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला.

         सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिलाच कार्यक्रम पार पडला.  वादग्रस्त ठरलेल्या मेट्रो 3 ला  हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी बोलत असताना  मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.

      युतीचे सरकार येऊन दोन महिने झाले आहेत. गेले अडीच वर्षे काय होते यांत मी आता जात नाही. त्याआधीच्या पाच वर्षे या मेट्रोचे काम प्रगतीपथावर होते. उद्या विघ्नहर्ताचे आगमन होत आहे. त्यामुळे राज्यावरील विघ्न सुद्धा दुरू होणार आहे. या मेट्रोमुळे अनेक गाड्यांचं इंधन वाचणार आहे. रस्त्यावरील गाड्यांची संख्या कमी होईल, प्रदुषण कमी होईल. आता राजकीय प्रदुषण पण आता बंद झालं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला.

       शेवटी पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आपलं काम आहे. पर्यावरणाचा ऱ्हास केला, असे आरोप झाले. पण याच्या तिन्ही बाजूला रस्ते आहे. जंगलात जाऊन काही झाडं तोडली नाही. सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे, असंही शिंदे म्हणाले.

       'जिथे प्रवासाची संपर्क यंत्रणा नाही. तिथे मेट्रोमुळे संपर्क तयार होणार आहेत. मेट्रो आरामदायी आहे. त्यामुळे प्रवाशांनाही आवडेल. आमचं सरकार आल्यावर आम्ही पहिली ॲाडर आश्विनी भिडे यांच्या नियुक्तीची काढली. शेवटी काम करणारा अधिकारी पाहिजे, त्याने झोकून दिले तर काम पूर्ण होत असते, असं म्हणत शिंदेंनी भिडे यांचं कौतुक केलं.

      आम्हाला आता कमी बॅालवर जास्त रन काढायचे आहेत. कारण आमच्याकडे फक्त अडीच वर्षच आहे. त्यामुळे जास्त काम करायचं आहे. तसा फडणवीस यांना 5 वर्षांचा अनुभव आहे. मी सभागृहात म्हटलो होतो, फडणवीस एकटचे तुम्हाला भारी पडतील. आता आम्ही दोघे आहोत, असंही शिंदे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं.

         हे सरकार जनतेचं सरकार आहे. इफ्रास्ट्रक्चरवर फोकस करणारे सरकार आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असल्यावर कुठल्याही प्रकल्पावर अडचणी येणार नाही. आम्ही ही अनेक आव्हांनावर मात करत हे सरकार आणलं आहे, असंही शिंदे म्हणाले. तसंच, समृद्धी महामार्गाचे काम राज्यातील सर्व विभागांना होणार आहे. लवकर नागपूर ते शिर्डी लोकार्पण करतोय, असंही शिंदे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने