संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी बिग्रेड आणि शिवसेना एकत्र येण गरजेच असल्याचे संभाजी बिग्रेडच्या प्रमुख प्रवक्त्याने म्हटले आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड यांच्याशी युती करत असल्याचे सांगताना लढावय्या सहकाऱ्यांचे स्वागत असा उल्लेख केला. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती तसेच, संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आमच्याकडे काही नसता सोबत आलात त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कौतुक वाटतं असल्याचे ठाकरेंनी म्हटले.
शिवप्रेमी असल्याने रक्त एकच आहे. दुहीच्या शापाला गाढून टाकू. एकत्र येत नवा इतिहास घडवू. निवडणुक डोळ्यासमोर ठेवून युती नाही असेहे ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
आजवरचा जो इतिहास आहे मग तो मराठी माणसांचा म्हणा, मराठ्यांचा म्हणा दुहीचा हा गाढत आलेला आहे. आपण एकत्र येऊन एक नवा इतिहास घडवू, दुहीच्या शापालाच गाढून टाकू. दुहीचा शाप आजवर आमचा घात करत आला. साक्षीपुरावे गोळा करण्याचे दिवस नाही, पण असं म्हटलं जातं की औरंगजेबानं सांगितलं होतं की मराठ्यांना जगाच्या पाठीवर काही तोड नाही. पण या भूमीत दुहीची बीजं खडकावर जरी फेकली तरी ती इतकी रुजतात किंवा फोफावतात की हा हा तमाम दौलत तबाह करून टाकतात. हे आपल्या शत्रूलाही कळलं होतं. आमची जी काही भूमिका रोखठोक आहे म्हणून एकत्र आलो आहोत. असे ठाकरे यावेळी म्हणाले.
तसेच, आमचं हिंदुत्व पटल्याने आम्ही एकत्र येत आहोत. लवकरच महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घेणार आहे. ही वैचारीक युती आहे. जे बिघडलंय ती शिवरायांचा महाराष्ट्राचा नाही. विचार मजबूत करायचा असेल तर एकत्रही लढू. असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला.
भाजपवर हल्लाबोल
भाजप संघाची विचारधारा मानत नाही. असा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजप संघाला मानतं मग तसं वागत का नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तर बर झालं शिंदे गेले असंगाशी संग तुटला असे म्हणत त्यांनी शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
कंत्राठी मुख्यमंत्री विधानासंदर्भात विचारले असता ' मुख्यमंत्री कुणी असला तरी संदेश यंत्रणा चांगली पाहिजे. मी तसं काही बोललो नव्हतो. असा युटर्न घेत, मी म्हटलेले की मग कंत्राटी पद्धतीने पीएम सीएम करायला काय हरकत आहे. ' असे ठाकरेंनी स्पष्ट केलं.
टिप्पणी पोस्ट करा