क्रीडा विद्यापीठ लवकर सुरू करण्यासाठी पुढाकार- सहकार मंत्री अतुल सावे

 


ब्युरो टीम: क्रीडा विद्यापीठ ही मराठवाडा भागाची गरज आहे. हे लवकर सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊ. पण क्रीडा विद्यापीठ औरंगाबादमध्ये करू, अशी घोषणा राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी रविवारी केली. औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने ४५३ खेळाडू, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शकांचा गौरव मंत्री सावे आणि आॅलिम्पियन दत्तू भोकनळ यांच्या हस्ते करण्यात आला. रमेश भंडारी यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, डॉ. उदय डोंगरे, डॉ. मकरंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

           डॉ. नीलेश गाडेकर (सोयगाव), नीलेश गायकवाड (पैठण), बाबासाहेब माने (सिल्लोड), विजय बारवाल (कन्नड), भाऊसाहेब खरात (वैजापूर), नामदेव पवार (फुलंब्री), कैलास वाहुळे (औरंगाबाद), राजेंद्र गंगावणे (खुलताबाद), नीलेश माने (गंगापूर) यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार व वैभव किरगत यांना आदर्श क्रीडा मार्गदर्शक देऊन गौरवण्यात आले.

          तसेच अदिती निलंगेकर (पॅराऑलिम्पिक), सृष्टी साठे (सुवर्णपदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग), शर्वरी कल्याणकर (सुवर्णपदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग), तनिशा बोरामणीकर (रौप्यपदक, आशियाई बुद्धिबळ), गौरव म्हस्के (कांस्यपदक, आशियाई ज्युनियर बॉक्सिंग), कशिश भराड (आशियाई तलवारबाजी), वैदेही लोया (आशियाई तलवारबाजी), साक्षी चितलांगे (रौप्यपदक, आशियाई बुद्धिबळ), तेजस शिरसे (आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा), रिद्धी हत्तेकर, सिद्धी हत्तेकर (आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धा), अभय शिंदे (आशियाई तलवारबाजी), श्रेयस जाधव (आशियाई तलवारबाजी), आयर्नमॅन संदीप गुरमे (युरोपियन चॅम्पियनशिप) यांच्यासह विविध खेळांतील ४५३ राष्ट्रीय खेळाडू, ५७ क्रीडा मार्गदर्शकांचादेखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

          कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. दिनेश वंजारे, विश्वास जोशी, डॉ. अब्दुल कादीर, डॉ. दयानंद कांबळे, डॉ. संदीप जगताप, अमृत बिऱ्हाडे आदींनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने