मुंबई: शिवसेनेत बंड
झाल्यानंतर शिंदे गटानं पक्षाचं चिन्ह मिळावं म्हणून निवडणूक आयोगाकडं धाव घेतली
होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून ४० आमदारांसह बंड करत भाजपसोबत
सत्ता स्थापन केली होती. शिंदे आणि फडणवीस यांच्या शपथविधीला एक महिन्यापेक्षा
अधिकचा कालावधी उलटलेला असताना अजूनही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात
आलेला नाही. परंतु बंड झाल्यानंतर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह मिळावं, यासाठी शिंदे गटानं निवडणूक आयोगकडं धाव घेतली
होती. त्यानंतर शिवसेनेकडूनही निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं होतं. त्यानंतर
दोन्ही गटांच्या पत्रांच्या आधारावरून आज निवडणूक आयोग निकाल देण्याची शक्यता आहे.
शिंदे गट आणि शिवसेनेच्या वतीनं आलेल्या
पत्रांमुळं निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना पुरावे सादर करण्यासाठी आठ ऑगस्ट म्हणजे
आजपर्यंतची मुदत दिली होती. ती आज संपणार असून त्यावर निवडणूक आयोग काही निर्णय
घेणार का?, हे पाहणं महत्त्वाचं
ठरणार आहे. दरम्यान सु्प्रीम कोर्टानं याआधीच्या सुनावणीत शिवसेनेच्या
निवडणूकीच्या चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश दिले होते, परंतु शिंदे गटानं कोर्टानं हे निर्देश दिलेच
नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या आजच्या भूमिकेकडं
राज्याचं लक्ष असणार आहे.
निवडणूक आयोग काय निर्णय
घेऊ शकतं?
जेव्हा पक्षातील दोन गट पक्षाच्या संघटनेवर
आणि चिन्हावर दावा करतात, तेव्हा निवडणूक
आयोग कोणत्या गटाला सर्वाधिक आमदार आणि खासदारांचं कुणाला समर्थन आहे, हे तपासते. त्यानंतर पक्षातील जेष्ठ आणि निर्णय
घेणाऱ्या समितीचं यावर नेमकं काय मत आहे, हे विचारात घेतलं जातं. या प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोग पक्षाचं चिन्ह गोठवू
शकतं. राज्यात निवडणुका जवळ असतील तर निवडणूक आयोग दोन्ही गटाला स्वतंत्र नाव आणि
नवीन चिन्ह नोंदणी करण्यासाठी सांगू शकतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर भविष्यात जर दोन्ही गट एकत्र येणार असतील तर
त्याची तपासणी करून पक्षाचं मूळ चिन्ह निवडणूक आयोग देऊ शकतं.
टिप्पणी पोस्ट करा