राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि . १५ नोव्हेंबर , २०२२ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर , २०२२ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री श्री .

सुधीर मुनगंटीवार यांनी दिली .

      ६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १५ नोव्हेंबर , २०२२ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे . तसेच ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी , संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी १ जानेवारी २०२३ पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे . तसेच १ ९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची स्पर्धेची प्राथमिक फेरी १ जानेवारी २०२३ पासून १० केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी २०२३ मध्ये आयाजित करण्यात येणार आहे . राज्य नाट्य स्पर्धेकरीता रु .३,००० / - इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष तर बालनाट्य स्पर्धेकरीता रु .१,००० / इतक्या रकमेचा धनाकर्षे स्पर्धक संस्थेने संचालक , सांस्कृतिक कार्य , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे . प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष ( डीडी ) संस्थांना परत करण्यात येईल . नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका , नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील .

      आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि . १५ सप्टेंबर , २०२२ पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात . १ ) मुंबई , कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक , सांस्कृतिक कार्य संचालनालय , जुने सचिवालय , विस्तार भवन , पहिला मजला , महात्मा गांधी मार्ग , मुंबई- ३२ ( ०२२-२२०४३५५० ) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात . २ ) पुणे महसूल विभागातील संस्थांनी , सहाय्यक संचालक , सांस्कृतिक कार्य संचालनालय , विभागीय कार्यालय , बंगला क्रमांक -४ , विमानतळ रोड , पुणे ( ९ ५७ ९ ०८५ ९ १८ ) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात . ३ ) औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक , सांस्कृतिक कार्य संचालनालय , विभागीय कार्यालय , रुम नंबर- ०२ , एमटीडीसी बिल्डिंग , गोल्डी टॉकीजच्या समोर , स्टेशन रोड , औरंगाबाद- ४३१००५ ( ०८७८८८ ९ ३५ ९ ० ) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात . ४ ) नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक , सांस्कृतिक कार्य संचालनालय , विभागीय कार्यालय द्वारा अभिरक्षक , मध्यवर्ती संग्रहालय , अस्थायी प्रदर्शन हॉल , तळमजला , सिव्हिल लाईन , नागपूर ४४०००१ ( ०७१२-२५५४२११ ) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात .

      विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाहीत . प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल . प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही , याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी . स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही , तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल . नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील . नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल . राज्यातील जास्तीत जास्त नाटय संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री . सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने