जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.सी.पी सिंह यांनी दिला पक्षाचा राजीनामा

 

 ब्युरो टीम: जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.सी.पी सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय धोरण ठरवण्यासाठी बिहारमध्ये आज जनता दल युनायटेड आणि राजद पक्षाच्या आमदारांची बैठक सुरु आहे. जदयूचे आमदार आणि खासदारांची बैठक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी होत असून राजद पक्षाच्या आमदारांची बैठक पक्ष नेते तेजस्वी प्रसाद यादव यांच्या अध्यक्षतेखाली, राबडी देवी यांच्या निवासस्थानी  सुरु आहे.

आपल्या पक्षाच्या नेत्यांचे विचार जाणून घेतल्यावर पुढील धोरण ठरवलं जाईल असं जदयू अध्यक्ष राजीव रंजन यांनी म्हटलं आहे.

          जीतन राम मांझी यांच्या नेतृत्वाखालच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चानं देखील आज आपल्या पक्षाचं धोरण ठरवण्यासाठी पक्षाच्या आमदारांची बैठक आयोजित केली आहे. जदयूनं भाजपा बरोबरची आघाडी मोडली तर आपण नितीशकुमार यांना पूरिण पाठिंबा देणार असल्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे.

दरम्यान, बिहारमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी राजद नेते तेजस्वी प्रसाद यादव यांना बिहारमधे युती सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणार असल्याचं पत्र दाखल केलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने