कर्णधार रोहित शर्माला नवीन इतिहास रचण्याची संधी, 'असे केल्यास बनेल भारतातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार


ब्युरो टीम: टीम इंडिया  आशिया चषक  स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात आज हाँगकाँगशी भिडणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला  इतिहास रचण्याची संधी आहे.

        जर टीम इंडियाने हाँगकाँगविरुद्ध विजयाची नोंद केली, तर रोहित शर्मा विराट कोहलीला मागे टाकूनफॉर्मेटमध्ये भारतातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल. एमएस धोनी  हा टी20 फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने कर्णधार असताना 72 पैकी 41 सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

        या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 30 टी20 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या विजयासह रोहित शर्माने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 30 सामनेही जिंकले आहेत. जर टीम इंडियाने बुधवारी हाँगकाँगचा पराभव केला, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा हा 31 वा विजय असेल.

------------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने