महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, या आरोपपत्रात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. ईडीच्यावतीने दिल्ली न्यायालयात पीएमएलए अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अलीकडेच ईडीने जॅकलिनची सुमारे 7 कोटी 12 लाखांची एफडी जप्त केली होती. आरोपी म्हणून जॅकलिनचे नाव आल्याने आता तिच्या अडचणीत वाढ झाली असून, या प्रकरणी ईडीकडून जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. सुकेशने जॅकलिनला 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू पाठवल्याचं ईडीला आढळून आलं होतं. त्यानंतर ईडीने केलेल्या कारवाईत आतापर्यंत जॅकलिनची 7 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्याचे तपासात समोर आले होते. यामध्ये कार, महागड्या वस्तू याशिवाय 1.32 कोटी आणि 15 लाख रुपयांच्या निधीचा समावेश होता.
टिप्पणी पोस्ट करा