संभाजीराजें यांनी तुळजाभवानीदेवीच्या साक्षीने 'स्वराज्य'च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण केले.

मा. खासदार संभाजीराजेंची यांनी आज तुळजापुर येथे तुळजाभवानीदेवीच्या साक्षीने 'स्वराज्य'च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण केले. तसेच आपल्या संघटनेच्या पहिल्या शाखेचे देखील उद्घाटन केले. आज क्रांतीदिनी यासाठी तुळजापूर येथे राज्यभरातून कार्यकर्ते आले होते. या आधी संभाजीराजेंची पुणे येथे पत्रकार परिषद झाली होती त्यात त्यांनी “महाराष्ट्राच्या भल्यासाठी नवी दिशा, नवा विचार, नवा पर्याय” आशा टॅगलाईन खाली आपली पुढील दिशा स्पष्ट केली होती
           आजच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून स्वयंस्फूर्तीने अनेक सहकारी या स्वराज्य कार्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते त्या सर्वांचे संभाजीराजें यांनी मनापासून आभार मानले व क्रांतीदिनी स्वराज्याचे रणशिंग फुंकले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने