शिंदे सरकारकडून बंगल्याचं वाटप;अजित पवारांचा मुक्काम 'देवगिरी'तच



ब्युरो टीम :
महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन आता महिना उलटला. अद्याप नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. पण काही मंत्र्यांना बंगल्याचं वाटप सरकारकडून करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांना देवगिरी बंगलाच पुन्हा एकदा देण्यात आला आहे.

     मविआ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना पवार दिवगिरी बंगल्यात राहत होते. मविआचं सरकार गेल्यानंतर आता अजित पवार विरोधीपक्ष नेते बनले आहेत. मात्र, त्यांचं वास्तव्याचं ठिकाण न बदलण्याचा निर्णय नव्या सरकारनं घेतला आहे. बंगल्यातील वास्तव्य इतरत्र न हालवता पुन्हा एकदा त्यांना हाच बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने