स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वात जास्त कार्यक्रम आयोजित करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यानिमित्तानं राज्यातल्या १८ जिल्ह्यात विविध प्रकारच्या ४२ कार्क्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हर घर तिरंगा उपक्रमात महारष्ट्रात २ कोटीहून अधिक घरांवर तिरंगा फडकवण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले.
यासाठी विविध पक्षाचे नेते, स्वयंसेवी संस्था आणि संघटना राज्यात ठीकठिकाणी राष्ट्रध्वज वाटत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मुंबई महानगर पालिकेनं ३५ लाखाहून अधिक ध्वज वाटले आहेत. या मोहिमेला चालना देण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत सुट्टीच्या दिवशी देखील टपाल कचेऱ्यात ध्वज विक्री सुरु राहील असं त्यांनी सांगितलं. महावितरण कंपनी आपल्या मासिक विद्युत बिलाबरोबर प्रत्येक घरात तिरंगा वाटत असल्याचं ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा