पशु,मत्स्य क्षेत्राची आवड असणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी हि गुड न्युज आहे. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत(Maharashtra Animal and Fisheries University) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
महाराष्ट्र अॅनिमल अॅण्ड फिशरीस युनिव्हर्सिटी अंतर्गत अॅक्वाकल्चर (Aquaculture), फिशरिस रिसोर्स मॅनेजमेंट (Fisheries Resource Management), अॅक्वाटिक अॅनिमल हेल्थ मॅनेजमेंट (Aquatic Animal Health Management) अतिथी व्याख्याता (Guest Lecturer) पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तसेच अॅक्वाकल्चरचे एक पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बी.एफ.सायन्सचे शिक्षण पूर्ण झालेले असावे. एम.एफ.सायन्स इन अॅक्वाकल्चर केलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवार नेट/पीचडी धारक असणे आवश्यक आहे. या शिवाय अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांची १८ ऑगस्ट २०२२ रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. यासाठी त्यांना मत्स्य विज्ञान महाविद्यालय, हजारी पहाड रोड, सेमिनरी हिल्स, नागपूर-४४०००६ या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. मुलाखतीला येण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
|
टिप्पणी पोस्ट करा