किरीट सोमय्यांनी जन्माष्टमीच्या कार्यक्रमात वाजवला ढोल



ब्युरो टीम: राज्यात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर यंदा प्रथमच मोठ्या उत्साहात जन्माष्टमी साजरी केली जात आहे.

     तरुणाईसह राज्य सरकारही मोठ्या दणक्यात दहीहंडी साजरी करताना दिसून येत आहेत. विविध राजकीय नेत्यानी मुंबईतील वेगवेगळ्या भागात राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावत दहीहंडीच्या कार्यक्रमात भाग घेतला.

    भाजप नेते किरीट सोमय्या  यांनीही दहीहंडी उत्सवात आपला सहभाग नोंदवलाय. यावेळी त्यांनी या जोशात ताशा-ढोल वाजवाण्याचा आनंद घेतला. एवढ्यावरच न थांबता सोमय्यांनी डान्सही केला. त्यांच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

      --------------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने