ब्युरो टीम: अतिवृष्टी काळात शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा विषयांवरुन महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांची शाळाच घेतली. उद्धव ठाकरे सभागृहात नाहीयेत मात्र त्यांचं काम आज अजितदादांनी केलं. बंडखोर आमदारांना नियम शिकवित जागच्या जागी गप्पगार केलं. यावेळी अजितदादांच्या निशाण्यावर नवनिर्वाचित मंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत होते.
राज्य विधिमंडळ अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशीची सकाळही विरोधकांनी गाजवली. काल "५० खोके सगळं ओक्के" अशा घोषणा देऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे गटातील आमदारांना डिवचलं. आज एक पाऊल पुढे टाकत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आपलं नवं 'घोषणास्त्र' बाहेर काढलं. गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो चले गुवाहाटी, अशी नवी घोषणा देऊन विरोधी पक्षाच्या आमदारांनी शिंदे गटाच्या आमदारांना हिणवलं.
नवीन सरकारला सत्तेवर येऊन अगदीच थोडे दिवस झाल्याने तसेच मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडल्याने विरोधकांच्या संबंधित विषयानुरुप प्रश्नाला उत्तरे देताना मंत्री महोदयांची तारांबळ उडाली तसेच भाषणादरम्यान अडथळे आणणाऱ्या नेत्यांना अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये गप्पगार केलं.
टिप्पणी पोस्ट करा