आपण जाणताच सध्या भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष चालू आहे. त्याच बरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही अमृत वर्षामध्ये ९ जुलै पासून प्रदापन झाले आहे. या दोन्हीचे अवचित्त साधुन अ.भा.वि.प जामखेड च्या वतीने भव्य १११ फूटी तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले होते. त्यामध्ये सामाजातील सर्व स्तरातील व्यक्तींनी व संस्थांनी व खास करून विदयार्थानी चांगला सहभाग दाखवला. ही जामखेड च्या इतिहासामधील पहिली भव्य तिरंग पदयात्रा असून यामध्ये जामखेड करांनी उत्साहत व आनंदात सहभाग नोंदवला.
अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. या यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड पासून सुरू झाली व यात्रेची सांगता जामखेड महाविदयालयाच्या परिसरात झाली.या कार्यक्रमास खास करून माजी सैनिकांचनी उपस्थीती लावली, तसेच या कार्यक्रमस, अभाविप दक्षिण नगर जिल्हा संयोजक अथर्व पाडळे यांनी यात्रेच्या आयोजनाचा उद्देश सर्वांसमोर मांडला व तसेच अभाविप नगर विभाग संघटनमंत्री ओंकार मगदूम यांनी अभाविप अमृतमहोत्सवी वर्ष व येणाऱ्या काळातील अभाविप करत असणाऱ्या कार्यक्रमाची माहीती सांगीतली तसेच छात्रशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे याच बरोबर आजचा विदयार्थी आजचाच नागरीक आहे त्यामुळे प्रत्येक विदयार्थ्यांने समाजाला ज्याज्या वेळी आवश्यकता असेल त्या वेळी कार्य तत्पर रहावे. असे मनोगत पर समारोप केला
या यात्रेच्या नियोजनामध्ये दक्षिण नगर जिल्हा संघटनमंत्री चेतन पाटील, विवेक जी कुलकर्णी शिवनेरी अॅकडनीचे भोर सर व त्यांचे विद्यार्थी, होशींग विद्यालय व जामखेड महाविदयाल जामखेड चे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोरे, तसेच अविराज डुचे, प्रथमेश कोकणे, कुणाल खटके, जय देशपांडे, ऋषिकेश ठांगील ,ओम मोरे,कृष्णा बुरांडे,निखिल आवारे, सुरज निमोंकर ,साहिल भंडारी,शुभम धनवडे, प्रसाद होशींग, गणेश पवार,निखिल अवरे,लहू राऊत,योगेश हुलगुंडे,गौरव समुद्र ,आश्विन राळेभात अभिनव कटारिया,सौरभ पवार, असे विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा